मुलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या चार खेळाडूंची निवड

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेने 2 ते 6 नोव्हेंबर यादरम्यान मुंबई येथे ज्युनिअर मुलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले असून त्यात ठाणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या चार खेळाडूंची निवड झाली आहे. हा संघ स्पर्धेसाठी रवाना झाला. यात टिटवाळा येथील विनायक बॉक्सिंग क्लबचा नारायण सिंग 63 ते 66 किलो वजनी गटात, नवेश मैराळे 57 ते 60 किलो वजन गटात तसेच ठाणे बॉक्सिंग अकादमीचा पार्थ सारखले हा 48 ते 50 तर वृषभ यादव याची 46 ते 48 किलो वजनी गटात निवड करण्यात आली आहे. नारायण सिंह हा गतवर्षीचा किशोर मुलांच्या राज्य अजिंक्यपद आणि सुवर्ण पदक विजेता आहे. त्याच्याकडून आतादेखील सुवर्ण ठोश्याची अपेक्षा करण्यात येत आहे. या संघाची प्रशिक्षक निशा गायकवाड तर संघव्यवस्थापक म्हणून जितेंद्र सिंग काम पाहत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading