मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महापालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. २५३९ ९६१७ या क्रमांकावर ठाणेकर नालेसफाई बाबतचा प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काल ठाण्यातील रस्ते आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यावेळी हलगर्जी करणा-या कर्मचारी-अधिकारी तसंच कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. तसंच नालेसफाईबाबत नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेनं ही हेल्पलाईन सुरू केली आहे.