मुंब्र्यात ८ जणांवर गुन्हा दाखल- २०० दुकानदारांना नोटीसा तर मास्क न लावणाऱ्या ३२ जणांकडून १००० रुपयांचा दंड वसूल

कोविड १९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत मुंब्रा प्रभाग समितीत कारवाई करीत असताना सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे, सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या ८ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली. सोशल डिस्टन्सींगचे पालन न करणे आणि सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या मुंब्र्यातील पापा, अन्वर सय्यद, अबुल गणी मर्चंट, एस.एफ. रजा, फैजान शेख, इकबाल अलीशेख, अफजल शेख, मोहम्मद शेख यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्क न लावणे अशा आशयाच्या नोटीसा २०० दुकानदारांना बजावण्यात आल्या आहेत. तसेच मास्क न लावणाऱ्या ३२ दुकानदारांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading