मुंब्र्यात एका रिक्षाला आग लागल्याने बाजूला उभ्या केलेल्या दोन वाहनांचे नुकसान

मुंब्र्यातील संतोष ग्राऊंड येथे एका रिक्षाला आग लागल्याने बाजूला उभ्या केलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंब्र्यातील बॉम्बे कॉलनीजवळ हा प्रकार घडला. संतोष ग्राऊंड येथे उभ्या केलेल्या रिक्षाला दुपारच्या सुमारास आग लागली. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली. परंतु रिक्षाला आग लागल्याने तिथेच बाजूला उभ्या असलेल्या ह्युंदाई सेंट्रो आणि व्हॅगनआर या दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दुपारी चारच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझविली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading