नाताळ तोंडावर आला असताना महापालिका आयुक्तांनी मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाजूला ठाणे महापालिकेनं निर्माण केलेल्या प्लॅटफॉर्म शाळेला भेट देऊन मुलांसमवेत चॉकलेट वाटत नाताळ साजरा केला. ठाणे महापालिकेच्या वतीनं मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर फलाटावर भीक मागणा-या मुलांसाठी प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यात आली आहे. या शळेमध्ये २० विद्यार्थी शिकत आहेत. या प्लॅटफॉर्म शाळेला पालिका आयुक्तांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. सान्ताक्लॉज सोबत सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटत नाताळ साजरा केला.