मुंब्रा भिवंडी मार्गावर उद्यापासून परिवहन सेवेच्या बसेस सुरू

मुंब्रा भिवंडी मार्गावर उद्यापासून परिवहन सेवेच्या बसेस सुरू करण्यात येत आहेत. भिवंडीकडे नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या मार्गावर परिवहनच्या बसेस सुरू कराव्यात अशी मागणी सातत्याने होत होती, ही मागणी लक्षात घेवून उद्यापासून मुंब्रा पोलीस ठाणे ते शिवाजी चौक भिवंडी मार्ग क्र. 84 या मार्गावर वर नव्याने परिवहनच्या बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन सभापतींनी दिली. ठाण्याबरोबरच मुंब्रा दिवा विभागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भिवंडी येथे अनेक उद्योगधंदे असून ठाण्याच्या सर्वच भागातून नागरिक येथे दैनंदिन ये-जा करीत असतात. या पार्श्वभूमीवर मुंब्रा विभागातील नागरिकांना दैनंदिन वाहतूकीची व्यवस्था व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि परिवहन समिती सदस्य शमीम खान आणि बालाजी काकडे यांनी परिवहन समितीकडे केली होती. या मागणीचा विचार करुन प्रायोगिक तत्वावर मार्ग क्र. 84 वर बससेवा उद्यापासून बस सेवा सुरू होत आहे. या बससेवेअंतर्गत मुंब्रा पोलीस स्टेशन ते शिवाजी चौक भिवंडी मार्गावर एकूण २० बसफेऱ्या असून सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत दर अर्धा तासाने बससेवा असून शिवाजी चौक भिवंडी ते मुंब्रा पोलीस स्टेशन या मार्गावरही 20 फेऱ्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading