जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२० नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ७२० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ५४ हजार ५७८ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार २९० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६ हजार ७६२ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६३० पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज १८३ नवे रूग्ण सापडले १ मृत्यू तर सध्या १ हजार ८८० रूग्ण उपचार घेत आहेत. ५९ हजार ८५६ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ३९१ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज २४४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १ हजार ८८८ रूग्ण उपचार घेत आहेत. ६० हजार ८७२ बरे झाले तर १ हजार २०५ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १३९ नवे रूग्ण १ मृत्यू तर १ हजार ४३० रूग्ण उपचार घेत आहेत. ५३ हजार ४०३ रूग्ण बरे झाले तर १ हजार १२४ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज ७१ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६८२ रूग्ण उपचार घेत आहेत. २५ हजार ८४१ कोरोनातून बरे झाले तर ८०४ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २० नवे रूग्ण, ० मृत्यू तर १९२ रूग्ण उपचार घेत आहेत. ११ हजार ३६२ बरे झाले तर ३७२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ७ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ५५ रूग्ण उपचार घेत आहेत. ६ हजार ४०५ कोरोनातून बरे झाले तर ३५५ जणं दगावले. अंबरनाथमध्ये १९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १८९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ८ हजार ३८५ बरे झाले तर ३१५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज २५ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १६८ रूग्ण उपचार घेत आहेत. ९ हजार ७४७ कोरोनामुक्त झाले तर १२७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज १२ नवे रूग्ण, २ मृत्यू तर २७८ रूग्ण उपचार घेत आहेत. १८ हजार ७६४ बरे झाले तर ५९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading