मुंब्रा प्रभाग समितीतील समशाद नगर येथील शंकर मंदिर रोडवरील बांधकामावर ठाणे महापालिकेच्यावतीने कारवाई

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेवून मुंब्रा प्रभाग समितीतील समशाद नगर येथील शंकर मंदिर रोडवरील शिवसेना शाखेमागे बांधण्यात आलेल्या ४ मजली इमारतीच्या अनधिकृत पाचव्या मजल्याचे आरसीसी कॉलम, स्लॅब आणि विटांचे बांधकाम ठाणे महापालिकेच्यावतीने तोडण्यात आले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत मुंब्रा प्रभाग समितीक्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात येत आहे. मुंब्रा परिसरातील कारवाई दरम्यान समशाद नगर येथील शंकर मंदिर रोड,शिवसेना शाखेमागे असलेल्या ४ मजली इमारतीच्या अनधिकृत पाचव्या मजल्याचे आरसीसी कॉलम, स्लॅब आणि विटांचे बांधकाम गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आले. यापुढेही निवडणूक कामकाज सांभाळून आचरसंहिता दरम्यानही शहरातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले,हातगाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading