मुंब्रा आणि खार्डी खाडीमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल खाडीतच नष्ट

मुंब्रा आणि खार्डी खाडीमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल खाडीतच नष्ट करण्यात आला. जिल्हाधिका-यांच्या निर्देशानुसार तहसिलदार युवराज बांगर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईच्या वेळी ४ सक्शन पंप आणि ७ बार्ज समुद्र ओहोटीच्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणं शक्य होत नसल्यामुळं पाण्यातच बुडवण्यात आले. ४ सक्शन पंप प्रत्येकी ५ लाख प्रमाणे २० लाख रूपये आणि ७ बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे १ कोटी ४० लाख असा एकूण १ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल पाण्यातच नष्ट करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading