मिशन इंद्रधनुष्य मोहिमे अंतर्गत वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण

मिशन इंद्रधनुष्य ४.० मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भाग, वीटभट्टी, झोपडपट्टी भाग, औद्योगिक क्षेत्र व इमारत बांधकाम कार्यक्षेत्रातील नियमित लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ मार्च पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात दिनांक ७ मार्च, ४ एप्रिल, ९ मे २०२२पासून  प्रत्येक वेळी पुढील ७ दिवस अशा तीन फेऱ्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेव्दारे लसीकरणापासून वंचित राहिलेले ० ते २ वर्ष वयोगटातील ३६० बालके व लसीकरणापासुन वंचित ८२ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading