मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने केली अटक

मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाने अटक केली आहे. शहरातील घरफोडी उघड करण्याच्या अनुषंगाने ठाणे गुन्हे शाखेकडील मालमत्ता शोध पथकाकडून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडील घरफोडीच्या गुन्ह्याबद्दल तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गोपनीय माहितीद्वारे समांतर तपास चालू होते. मुंब्र्यातील एका प्रकरणात अज्ञात व्यक्तीने ५ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घरफोडी करून चोरी केली होती. या व्यक्तीचा शोध घेत असताना आरोपी कौसा मुंब्रा बायपास ब्रीजच्याय जवळ गुन्ह्यातील मालमत्ता विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून आरफीन सय्यद याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading