मावळी मंडळच्या दिव्यांशीने फ्रान्समध्ये झालेल्या टेबल टेनिसमध्ये केली सुवर्णपदकाची कमाई

मावळी मंडळच्या ऍस टेबल टेनिस क्लबच्या दिव्यांशी भौमिकने फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेन्डर स्पर्धेत 13 वर्षाखालील मुलींच्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण पदक कमावले. दिव्यांशीने उझबेकिस्तानची कमलोवा अरुजन हिचा पराभव करून सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशात राष्ट्रीय शिक्षक आकाश कासार ह्यांचे मोलाचे योगदान आहे. टेबल टेनिस खेळाच्या सरावासाठी तीचे पालक तिला नियमितपणे कांदिवलीवरून ठाणे येथील मावळी मंडळ संस्थेत येण्यासाठी जवळपास 2 तासांचा रोजचा प्रवास करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading