माथेरानला फिरायला गेलेल्या एका महिलेचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गीता मिश्रा ही महिला आपल्या दोन लहान मुली आणि पतीसह माथेरानमधील बेल विडीयर पॉईंटवर फिरायला गेली होती. त्यावेळी दुपारी फिरताना एका लहान दगडाला ठेच लागल्यानं ती ८०० फूट खोल दरीत पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सह्याद्री रेस्क्यू टीम आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीनं तीन तासाच्या अथक प्रयत्नाने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.