माजिवडा येथे कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू

माजीवडा येथे उड्डाणपुलावरून कंटेनर खाली कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच मृत झाल्याची घटना मध्यरात्रीच्या पावणेतीनच्या सुमारास घडली. नाशिककडे जाणारा एक कंटनेर माजीवडा उड्डाणपुलावरून जात असताना माजिवडा पोलीस चौकी समोरील रस्त्यावर कोसळला. यामध्ये कंटेनर चालक आझादी हा जागीच मरण पावला. हा कंटेनर औषध साठा घेऊन जात होता. ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ट्रॅफीक पोलीसांनी तातडीनं धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं. तर दुस-या एका घटनेत आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगानं येणारा मिक्सर ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला. हा ट्रक कॉन्क्रीटने भरलेला होता. गायमुख जवळील अपघात प्रवण क्षेत्राच्या इथे असलेल्या विचित्र वळणात वेग भरधाव असल्याने हा अपघात झाला. आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं घटनास्थळी जाऊन रस्त्यावरील कॉक्रीट साफ करून रस्ता मोकळा केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading