माजिवडा येथील उड्डाणपूलावरून पडून काल एकाचा मृत्यू

माजिवडा येथील उड्डाणपूलावरून पडून काल एकाचा मृत्यू झाला. मुंब्रा येथील फहाद आणि अबुझर हे दोघे मुंब्र्यातच मोबाईल दुरूस्तीचं काम करतात. काही कामासाठी काल ते आपल्या दुचाकीवरून कासारवडवलीला आले होते. सकाळच्या सुमारास पुन्हा मुंब्र्याकडे जात असताना झालेल्या अपघातात अबुझरचा मृत्यू झाला. माजिवडा उड्डाणपूलावर भर घेताना वळण घेताना त्यांचं दुचाकीवरील नियंत्रम सुटलं आणि त्यांची दुचाकी दुभाजकाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की हे दोघेही उड्डाणपूलाखालील गोल्डन डाईज नाका येथील चौकात कोसळले. यामध्ये दुचाकी चालवणारा फहाद हा गंभीर जखमी झाला तर मागे बसलेल्या अबुझरच्या डोक्याला मार लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर कंटेनर कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading