माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील डोंगर उतारावरील धोकादायक घरे रिकामी करुन सील करण्याची कारवाई करण्यात आली. माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत श्री माँ निकेतन शेजारी इंदिरापाडा पातलीपाडा येथील डोंगर उतारावरील 14 निवासी घरे असून पावसाळयाच्या दिवसात आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिवृष्टी, पूर, भुस्खलन या नैसर्गिक घटनांमुळे येथील घरे खचून कोणतीही जीवीत आणि वित्त हानी होऊ नये याकरिता संबंधितास नोटीसा देऊन त्यांनी आपला निवासी भोगवटा रिक्त केल्यानंतर या सर्व झरांना प्रभाग समिती कार्यालयाकडून सील करण्यात आलेले आहे. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील डोंगर उतारावर निवासी वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी पावसाळ्याच्या दिवसात घरे खचून कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता आपला भोगवटा रिक्त करुन इतरत्र स्थलांतर करावे यासंबंधी ठाणे महापालिकेकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. तसेच ढोकाळी नंदीबाबा रोड ते लोढा अमारा रस्तारुंदीकरणाच्या कामकाजात अडथळा ठरणारी 5 तात्त्पुरत्या शेडची उभारणी काढून टाकण्यात आली. हातगाड्या व सामान जप्त करण्यात आले असून ढोकाळी रस्ता मुंबई महापालिका पाणी पुरवठा कार्यालयाच्या भिंतीलगत फूटपाथवर गायी बांधाणाऱ्या भिक्षुकांना त्या ठिकाणाहून हटविण्यात आले, तसेच त्यांचे सामान जप्त करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading