माजिवडा मानपाडा प्रभागसमितीतील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत बाळकुम दादलानी येथे अशोक नगरच्या मागे भूखंडावर रितेश पाटील आणि अतिश पाटील यांनी केलेले अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागामार्फत करण्यात आली. बाळकूम दादलानी येथे अशोकनगरच्या मागे असलेल्या भूखंडावर अतिक्रमण केल्याची तक्रार माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाली होती. त्यानुसार पत्राशेडची अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली. तसेच प्लॅस्टिक भंगार आणि काच भंगार जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. तसेच बाळकुम नाका भिवंडी रस्त्याच्या डावी बाजूकडील हातगाड्या तसेच गॅरेजचे शेड जेसीबी मशीनने तोडण्यात आले. ही कारवाई कापूरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडील उपलब्ध पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading