ठाणे महापालिका क्षेत्रात अतिक्रमण आणि हातगाडी विरोधी कारवाई सुरू असून या कारवाई अंतर्गत आज माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत माजिवडा प्रभाग समिती कार्यालयामागील 2 पत्राशेडची अतिक्रमणे जेसीबी मशीनच्या सहाय्याने तोडण्यात आली. तसेच बाळकुम भिवंडी रस्ता डावी बाजू या ठिकाणी हातगाडी, फेरीवाले यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करुन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे तेथील 22 हातगाड्या जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागेवरच तोडण्यात आल्या आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झालेला रस्ता मोकळा करण्यात आला.