महिला ट्रॅफिक पोलिसांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप

महिला ट्राफिक पोलिसांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 25 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तज्ञ मंडळींकडून मासिक पाळी विषयी मार्गदर्शन करण्यात आले असून महिलांना सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. तीन हात नाका जवळील वाहतूक पोलीस शाखेत महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम पार पडला असून कार्यक्रमासाठी आलेल्या पोलीस महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एसीपी कवियत्री गाविद आणि पीआय चेतना चौधरी या महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या सावी ग्रुप च्या सारिका डगे या प्रतिनिधींनी महिलांना मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच सेंद्रिय सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे फायदे इत्यादींबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी मासिक पाळीच्या दिवसात जवळपास १२० एमएल रक्तस्त्राव शोषू शकणाऱ्या सॅनिटरी पॅडचे प्रात्यक्षिक महिलांना दाखवले. कार्यक्रमादरम्यान महिला पोलिसांना सावी ग्रुप कडून मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
आधुनिक काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात उत्तम काम करीत असून आर्थिक दृष्ट्या देखील त्या स्वावलंबी होत आहेत. तेव्हा महिलांमध्ये आर्थिक गुंतवणुकीविषयी देखील साक्षरता निर्माण व्हावी आणि आर्थिक बाबींविषयी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने प्रुडेंट कनेक्ट च्या गणेश सांगळे यांच्या तर्फे महिलांना गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनात केमिकल युक्त उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक  उत्पादनांचा अधिकाधिक वापर करावा याबाबत एनएक्सटेगन इंडिया इंटरप्रायजेसच्या दीपक पाटकर यांनी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading