महावितरण मधील विविध कामगार संघटनांची विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने

महावितरणच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महावितरण मधील विविध कामगार संघटनांनी विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे विभागातील प्रशासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज महावितरणच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन मुख्यालयासमोर निदर्शने केली. महावितरणातील इंटकची वीज कामगार, कामगार सेना, कामगार महासंघ, मागासवर्गीय संघटना,स्वाभिमानी विद्युत वर्कर्स यांनी एकत्र येत प्रशासकीय कामकाजा विरोधात निदर्शने केली. ठाणे मंडल अधिक्षक अभियंता अरविंद बुरपुल्ले,कार्यकारी अभियंता माने आणि एच.आर. मॅनेजर रसिका भोळे यांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी करित कारवाईची मागणी केली. या निदर्शनानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर “चलो प्रकाशगड” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या निदर्शनास मोठ्या संख्येने महावितरणचे कामगार सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading