महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ठाण्यामध्ये साकेत येथील पोलीस मैदानात मुख्य शासकीय सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटनं, आरोग्य शिबिरं, पूजा असे विविध प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निशमन, पोलीस आणि नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली. या संचलनाचं नेतृत्व परेड कमांडर महादेव गडदे आणि सहाय्यक परेड कमांडर राजेंद्र कुळसंगे यांनी केलं. या सोहळ्यास जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसंच राजकीय नेते उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading