महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्यामुळे कळवा-मुंब्रा भागाचा पाणीपुरवठा ठप्प

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटल्यामुळे कळवा मुंब्रा आणि खारेगाव परीपरिसराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ही जलवाहिनी दुपारी फुटली. शिळफाट्याजवळ ही सुमारे सव्वा पांच फूट फूट व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागात पाणीच पाणी झालं होतं. ही जलवाहिनी फुटल्याचे वृत्त समजताच मदत यंत्रणा यांनी धावघेतली आणि जवळपास दहा जणांना सुरक्षित स्थळी हलवल. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचा काम महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळाने त्वरित हाती घेतल आहे. दुरुस्तीचं हे काम पूर्ण होईपर्यंत मुंब्रा खारेगांव आणि कळव्याचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम संपल्यानंतर हा पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे असं महामंडळाने कळवल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading