महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात तेजस लोखंडेला सुवर्ण तर श्रुती मोरेला कांस्यपदक

ठाण्याचे तेजस लोखंडे व श्रुती मोरे यांना महाराष्ट्र ऑलिंपिक वेटलिफ्टिंग स्पर्धात चमकदार कामगिरी केली आहे.

पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धात ठाणे जिल्ह्यातील खेळाडू तेजस लोखंडे व श्रुती मोरे यांना चमकदार कामगिरी केली आहे तेजस लोखंडे याने 89 किलो वजनी गटात 306 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले तर श्रुती मोरे हिने 71 किलो वजन गटात 148 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळविले.तेजस लोखंडेला काथोड भोईर यांचे मार्गदर्शन लाभले असून सध्या नॅशनल सेंटर ऑफ एक्सीलेंस औरंगाबाद येथे सराव करीत आहे. श्रुती मोरे हिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मधुरा सिंहासने,दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन लाभले ती सध्या अश्वमेध वेटलिफ्टींग फाऊंडेशनच्या वेटलिफ्टींग सेंटर ठाणे येथे सराव करते. तसेच खेळाडूंना वेटलिफ्टींग असोसिएशन ठाणेचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशातील महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे.वेटलिफ्टिंग मध्ये देखील खेळाडूने त्यांची उत्तम कामगिरी कायम ठेवत तेजस लोखंडे याने 89 किलो वजनी गटात सुवर्णपदक तर श्रुती मोरे हिने 71 किलो वजन गटात कांस्यपदक मिळवून ठाण्याची मान उंचावली आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading