महापौर मिनाक्षी शिंदे यांना दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी

ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांना दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. या धमकीनं एकच खळबळ उडाली आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांना १७ सप्टेंबर रोजी रात्री एका अनोळखी व्यक्तीनं फोन केला आणि आपण दाऊदचा माणूस बोलत असल्याचा दावा करत त्याने ही धमकी दिल्याचं सांगितलं जातं. या धमकीमुळे धास्तावलेल्या महापौरांनी तातडीनं पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला महापौराला थेट उचलून नेण्याची धमकी देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading