महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २९८ किलो प्लास्टिक जप्त तर १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात आली. १ जुलै ते ८ जुलै या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये सुमारे २९८ किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनद्वारे प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंच्या उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरी महापालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर गेले काही दिवस अकस्मात धडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण २९८ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून १ लाख १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading