महानगरची गॅसवाहिनी हिरानंदानी परिसरात फुटल्यामुळे जवळपास बाराशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित

महानगरची गॅसवाहिनी काल हिरानंदानी परिसरात फुटल्यामुळे जवळपास बाराशे हून अधिक ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडित झाला होता. घोडबंदर भागात रस्त्याचे काम सुरू असताना 125 मिलिमीटर व्यासाची गॅस वाहिनी फुटली. ही गॅस वाहिनी दुरुस्त करण्यासाठी जवळपास दीड तास गेल्यामुळे या परिसरातील गॅस पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे जवळपास बाराशे हून अधिक ग्राहकांना गॅस पुरवठा वीणा राहावे लागले. संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास हा गॅस पुरवठा खंडित झाला. ही माहिती मिळताच महानगर गॅस अधिकारी आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणांनी परित त्वरित धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र हे दुरुस्ती पूर्ण होणे यास बराच कालावधी लागल्यानं या भागाचा गॅस पुरवठा ठप्प झाला होता. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही हानी झाली नाही अस आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading