मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार

विज्ञान विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये रूची निर्माण व्हावी, विज्ञान विषयक माहिती मराठीमधून लोकांपर्यंत पोहचवता यावी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या विज्ञान विषयक प्रश्नांना उत्तरं मिळावीत या उद्देशानं मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार आहे. ही माहिती मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. विज्ञान कट्ट्यावर दर महिन्यातून एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. खगोलशास्त्र, इस्त्रोचं कार्य, शारिरीक, महिला आणि लहान मुलांचे आरोग्य, बौध्दीक कार्यक्षमता, कचरा व्यवस्थापन, हवामान बदल, रंगोपचार पध्दती, संगीतोपचार पध्दती, अंधविश्वासामुळं होणारं नुकसान, विज्ञान शिक्षण विषयक मार्गदर्शन, सण-उत्सव आणि विज्ञान, वेळेचं व्यवस्थापन, मोबाईल, फेसबुक, व्हॉटस् ॲपचा सुरक्षित वापर अशा विविध वैज्ञानिक विषयांवरची माहिती आणि शंका समाधान या विज्ञान कट्ट्यावर केलं जाणार आहे. असे विज्ञान कट्टे जिल्ह्यातील इतर भागातही सुरू करण्याचा विज्ञान परिषदेचा मानस आहे. शहरात हा विज्ञान कट्टा त्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या मदतीनं करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading