मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विमान उडते आकाशी या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन

नगरसेविका रुचिता राजेश मोरे आणि परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने “विमान उडते आकाशी” या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रभागातील तसेच, ठाणे शहरातील दोनशे पेक्षा अधिक बालदोस्तांनी आणि त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला. आजवर आकाशात उडणारे विमान मुलांनी पाहिले होते. पण या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांनी विमान प्रत्यक्ष बनवून आकाशात उडविण्याचा अनुभव घेतला. ही कार्यशाळा विनामुल्य होती. यावेळी सहभागी मुलांना विमानाचे मॉडेल देखील देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading