मध्य रेल्वेतर्फे कल्याण रेल्वे यार्डात रंगीत तालीम

मध्य रेल्वेतर्फे एखादी आपत्ती घडल्यास त्याला प्रतिसाद कसा मिळू शकतो याविषयी कल्याण रेल्वे यार्डात एक रंगीत तालीम करण्यात आली. आपत्ती प्रतिसाद विभागाच्या सोबत ही रंगीत तालीम करण्यात आली. काल कल्याण अप यार्ड येथे ही रंगीत तालीम करण्यात आली. जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांची कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यात आली. जिथे ट्रेनचा एक डब्बा रुळावरून घसरला आणि शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली. जिथे प्रवासी जळत्या कोचमध्ये अडकले होते.सकाळी साडेदहा वाजता कवायत सुरू झाली आणि क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रणास त्वरित संदेश दिला. नियंत्रण कार्यालयाने तात्काळ कारवाई केली आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अपघात निवारण ट्रेन, रेल्वे मेडिकल रिलीफ व्हॅन, रेल्वेचे नागरी संरक्षण कर्मचा-यांना कळवण्यात आलं. नागरी संरक्षण दलानं प्रथम प्रतिसाद दिला. त्यानंतर अग्निशमन दल आलं आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. डबा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान डब्यात दाखल झाले. त्यानंतर जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या आरपीएफनेही एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश केला. आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. रंगीत तालमीच्या वेळी यंत्रणेतील सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण परिस्थिती एका तासात नियंत्रणात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading