ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद

ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शट डाऊनच्या काळात, शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईप लाईन या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, शुक्रवार रात्री ९ ते शनिवारी सकाळी ९ या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समता नगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळवा येथील काही भाग यांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शट डाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. पाणी नाही

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading