भारत निवडणूक आयोगाद्वारे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

भारत निवडणूक आयोगाद्वारे 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदार यादी शुध्दीकरण आणि अद्यावतीकरण करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे. संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्यावत करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) ची नेमणूक करावी. यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान दि. २१ जुलै २०२३ ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करण्याची मोहिम राबविणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या या कार्यक्रमांस जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आपल्या स्तरावरून विस्तृत प्रमाणात प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त नव मतदार, संभाव्य मतदार यांच्या नोंदणीसाठी प्रयत्न करावे. तसेच मयत / स्थलांतरित मतदारांची वगळणी करण्यासाठी विहित कार्यपध्दती अवलंबून कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या सहकार्यामुळे भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो संपूर्णपणे यशस्वी होईल, असे शिनगारे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading