ब्रिम्स संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल

वस्तुनिर्माण उद्योग संस्थांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने व्ही. एन. बेडेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल कोकयुयो कॅम्लिन लिमिटेड या औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक संस्थेचे संचालक नितीन जोशी आणि शैक्षणिक प्रमुख स्मिता जपे यांच्या प्रोत्साहनाने आयोजित केलेल्या या औद्योगिक भेटीत एच. आर मार्केटिंग, ऑपरेशन्स, फायनान्स यामधून ४४ विद्यार्थी तर २ सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश होता. कोकयुयो कॅम्लिन लिमिटेड ही स्टेशनरी विभागात अग्रगण्य असलेल्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. कोकयुयो ही जपानची उत्पादन कंपनी आहे. कॅम्लिन आणि कोकयुयो यांच्या संयुक्त उपक्रमातून निर्माण झालेला पहिला औद्योगिक प्रकल्प म्हणजे पाताळगंगा प्लांट. यावेळी विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्राशी निगडित प्रश्नांवर चर्चा केली. या प्लांटमध्ये महिला सक्षमीकरण, सौरऊर्जा प्रकल्पासारखा हरित उपक्रम, १०० % झिरो डिस्चार्ज, मॅन्युअल असेंब्ली, रोबोटिक ऑपरेशन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री अशा विविध वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या प्लांट मधील संपूर्ण मनुष्यबळापैकी ८० टक्के असलेले स्त्रीमनुष्यबळ हे महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे . औद्योगिक प्रक्रियांमधून निघणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर, सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने नैसर्गिक संवर्धनात संस्थेने उत्तम कामगिरी केली आहे. प्रगतीच्या पथावर असतानाच स्वच्छता, सुरक्षितता , ५ एस.टेक्निक चा सुयोग्य वापर ह्या गोष्टींना संस्थेने चांगल्या प्रकारे जपलेले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading