ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड मार्गावरील वाहतुकीत बदल

कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मेट्रो 4 चे काम चालू आहे. सदर मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. ब्रम्हांड सिग्नल ते पातलीपाडा ब्रिज घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी वाहतूकीस बदल करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे आहे.

        प्रवेश बंद – 1) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. (ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद – 2) मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद – 3) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

            (1) जड अवजड वाहने सोडून इतर हलकी वाहने ही गर्डर टाकणेचे वेळी ब्रम्हांड सिग्नल पासून विरूध्द दिशेने वळण घेवून पातलीपाडा ब्रिज मार्गे ब्रिज उतरणीजवळ खुला करण्यात आलेल्या डिव्हायडर पासून डावीकडे वळण घेवून पुढे घोडबंदर रोड मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.

            (2) घोडबंदर कडून ठाणेचे दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना पातलीपाडा ब्रिजवर प्रवेश बंद करून सदरची वाहने पातलीपाडा ब्रिजखालून इच्छित स्थळी जातील.

            1) दि. १२ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा.ते दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.    २)दि.१३ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १४ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.

            ३)दि.१४जानेवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.

            ही वाहतूक अधिसूचना ही वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त  डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading