बोरिवलीला जाणा-या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळं अपघात

ठाण्याहून बोरिवलीला जाणा-या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळं आज सकाळी अपघात झाला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. सकाळी ठाण्याहून बोरिवलीला जाणा-या परिवहन सेवेच्या बसचे ब्रेक टोलनाक्याजवळ निकामी झाले. बस चालकाच्या हे लक्षात येताच बस चालकानं ही बस रस्ता दुभाजकावर चढवली त्यामुळं अनेकांचे प्राण वाचू शकले. टोलनाक्यावर ५ ते ६ वाहनं उभी होती आणि बसमध्येही जवळपास १५ प्रवासी होते. पण बस चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळं मोठी दुर्घटना टळली. अपघाताचं वृत्त येताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाला पाचारण करण्यात आलं. हैड्रॉलिक क्रेनच्या सहाय्यानं काही वेळातच ही बस पुन्हा एका बाजूला करण्यात यश आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading