बेस्ट बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू तर तरुण गंभीर जखमी

बेस्ट बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पूर्व द्रूतगती महामार्गावर कोपरी ब्रीजजवळ मोटरसायकलवरून जाणा-या दोघांना बेस्टच्या बसने उडवले. बसचा धक्का लागताच मोटरसायकलवर बसलेले दोघेही गाडीसह खाली पडले. यामध्ये मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या समिक्षा परब हिचा जागीच मृत्यू झाला असून प्रमोद सैम हा गंभीर जखमी झाला. त्याला गोडबोले रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तो लोकमान्यनगर मध्ये राहणारा आहे. तर समिक्षा परब ही दिव्याची रहिवासी आहे. नौपाडा पोलिसांनी बेस्टची बस आणि मोटारसायकल दोन्ही ताब्यात घेतली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading