बारावीच्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण – बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींची बाजी

बारावी परीक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्यातून 84.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल 86.71 टक्के ,कला शाखेचा निकाल 73.77 टक्के, वाणिज्य शाखेचा
निकाल 87.6% लागला आहे. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला 90 हजार 461 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 76 हजार 556 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात 7 हजार 843 विद्यार्थ्यांना
डिस्टिंक्शन, 24 हजार 700 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 38 हजार 534 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 5,हजार 479 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात सर्वाधिक म्हणजे 87.06 टक्के विद्यार्थी वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल 86 .71% लागला आहे.
विज्ञान शाखेत 26 हजार 372 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 22 हजार 868 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण होणाऱ्या मध्ये 2हजार 129 विद्यार्थी डिस्टिंक्शन, 7 हजार 557 प्रथम श्रेणी, 12हजार
384 द्वितीय श्रेणी, तर 798 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 87.06 टक्के लागला असून वाणिज्य शाखे शाखेतून 47 हजार 718 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली,
त्यापैकी 41 हजार 543 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5 हजार 245 प्रथम श्रेणी, 14 हजार 244 द्वितीय श्रेणी, तर पास श्रणीत 3हजार 554 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल
73,- 77 टक्के लागला आहे. कला शाखेतून 15 हजार 553 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली त्यापैकी 11 हजार 473 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 419 विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन, 2 हजार607
विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 7 हजार131 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 1 हजार 316 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

ठाणे जिल्ह्याच्या आज जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यामध्ये 47 हजार 705 विद्यार्थी तर 42 हजार 756 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली,
यापैकी 38 हजार 430 विद्यार्थी तर 38 हजार 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. टक्केवारी मध्ये मुलींचे उत्तीर्ण होणाऱ्या होण्याचे प्रमाण हे 89. 17 टक्के तर मुलांचं 80.56 टक्के आहे. बारावीचा ठाणे
शहराचा निकाल पाहता याठिकाणीही मुलींचा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. ठाणे शहरातून 9 हजार 727 विद्यार्थी तर 8 हजार784 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली त्यापैकी 8 हजार दोन
विद्यार्थी तर 7 हजार 892 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. टक्केवारी मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलांचे प्रमाण हे 82.27 टक्के आहे तर मुलींचे प्रमाण हे 89.85 टक्के आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading