ठाणे वाहतूक शाखेनं गेल्या १० दिवसात नियमभंग करून वाहनं चालवणा-या एकूण १४२९ वाहन चालकांविरूध्द कारवाई करून १५ लाखाहून अधिक रूपयांचा दंड वसूल केला आहे. फॅन्सी नंबर प्लेटची वाहनं चालवणा-या वाहन चालकांविरूध्द कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख ५४ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. कासारवडवली, वागळे, कापुरबावडी, ठाणे नगर, भिवंडी, नारपोली, कोळसेवाडी, कल्याण अशा विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. तर रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला प्रवासी घेण्यास मनाई असतानाही असे प्रवासी घेणा-या १७८८ रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करून ११ लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. कोनगाव, कल्याण, डोंबिवली, कोळसेवाडी, ठाणे नगर, वागळे, कापुरबावडी, कळवा, भिवंडी अशा विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.