प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २७९ किलो प्लास्टिक जप्त तर ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल

प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे २७९ किलो प्लास्टिक जप्त करून ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अविघटनशील कचरा कायद्याअंतर्गत प्लास्टीक आणि थर्माकोल पासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुकवर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महापालिका क्षेत्रात ही बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण २७९ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading