प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देवून आयुक्तांनी घेतला शहरातील स्थितीचा आढावा

ठाणे शहरात दुपारपासून पावसाची संततधार सुरू असून सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढला असल्याने शहरातील सखल भागात पाणी ठिकठिकाणी पाणी साचले असून नागरिकांच्या तक्रारी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर सायंकाळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी करुन  शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. आज दुपारी 1.30 वाजल्यापासून सायं. 7.30 पर्यत या सहा तासात ठाणे शहरात 127.77 मि.मी पाऊस पडला असून  पावसाचा जोर उशिरापर्यत कायम होता. आज आणि उद्या शहरामध्ये ऑरेज ॲलर्ट जारी करण्यात आला असून उद्याही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व यंत्रणा सतर्क रहावी यासाठी आयुक्तांनी सूचना दिल्या. आज दिवसभरात प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात  शहरात पाणी साचणे, झाडांच्या फांद्या उन्मळणे, वाहतूक वळविल्याच्या तक्रारींचा आढावा आयुक्तांनी घेतला तसेच प्रलंबित तक्रारी विनाविलंब  निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रादेशिक आपत्ती  व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त तक्रारींची नोंद झाल्यानंतर त्या तक्रारींचे निराकरण होईपर्यत तक्रारीचा सतत आढावा घेतला जावा अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या.  ठाणे शहरात दिवसभरात पडलेल्या  पावसाची नोंद घेत असतानाच शहरातील प्रभागनिहाय किती पाऊस झाला याचीही आकडेवारी उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनाला दिल्या. आपत्ती व्यवस्थापन कक्ष, एनडीआरएफची टीम व टीडीआरएफची टिम यांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक त्या ठिकाणी टिम पाठविण्याच्या सूचना दिल्या.

वृंदावन, भास्कर कॉलनी, चिखलवाडी आणि इतर काही परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे संबंधित उपायुक्तांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्रीही पावसाचा जोर कायम  राहण्याची शक्यता असल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क तर  असावीच व आवश्यकतेप्रमाणे फिल्डवर उपस्थित रहावे अशाही सूचना दिल्या.

तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीचे निवारण होईपर्यत सतत तक्रारीचा आढावा घेतला जावा. तसेच तीन शिफ्टमध्ये काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपली ड्यूटी संपताना तक्रारीच्या निराकरणाबाबत एकमेकांशी समन्वय साधावा. तसेच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज हे लवकरात लवकर डिजीटलायजेशन पध्दतीने सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading