प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळं दोन मार्ग बंद करण्याचा ठाणे परिवहन सेवेचा निर्णय

ठाणे परिवहन सेवेनं प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळं दोन मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सोयीसाठी आनंदनगर आगार ते ठाणे स्टेशन पश्चिम या मार्गावर बससेवा चालवली जाणार आहे. चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम हा ७७ क्रमांकाचा मार्ग तसंच किसननगर ते विटावा हा १०१ क्रमांकाचा मार्ग प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळं १६ जून पासून बंद केला जाणार आहे. या मार्गावरील बससेवा आनंदनगर आगार ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्गावर चालवली जाणार आहे. घोडबंदर मार्गावर मार्ग क्रमांक ६३, आनंदनगर आगार ते ठाणे पश्चिम दरम्यान स्वस्तिक सोसायटी, विजय पार्क, हॉटेल संभूजी, वाघबीळ नाका मार्गे बससेवा सुरू केली जाणार आहे. आनंदनगर आगार ते ठाणे पश्चिम मार्ग क्रमांक ६३ ची बस सकाळी साडेसहा पासून दर २५ मिनिटांनी रात्री ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत तर ठाणे स्टेशन पश्चिम ते आनंदनगर या मार्गावर सकाळी ७.२५ पासून रात्री १०.२५ पर्यंत दर २५ मिनिटांनी धावणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading