पोलीस आयुक्त विवेक फणसळकर कोरोना संसर्गातून बरे झाल्यामुळे घरी परतले

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे कोरोना संसर्गातून बरे झाल्यामुळे घरी परतले आहेत. ८ सप्टेंबरला पोलीस आयुक्त कोरोना संक्रमण उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले होते. ताप आणि घसा दुखीमुळे त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळं ते रूग्णालयात दाखल होते. आता ते त्यातून बरे झाले असून आज रूग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आलं. पुढील काही दिवस विश्रांती घेऊन आपण पुन्हा सेवेत रूजू होऊ असा विश्वास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading