पुढील वर्षी घटस्थापना १८ दिवस उशीरानं

पुढीलवर्षी घटस्थापना १८ दिवस उशीरानं होणार आहे. यावर्षी आज नवरात्र समाप्त होत आहे. यावर्षी क्षय तिथी आणि वृध्दी तिथी न आल्यानं नवरात्र सलग ९ दिवसांचं झालं. पुढील वर्षी अश्विन अधिक महिना असल्यानं घटस्थापनेचा दिवस १८ दिवस उशीरानं येणार असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. पुढील वर्षी घटस्थापना शनिवार १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसंच नवरात्र संपण्याच्याच दिवशी अश्विन शुक्ल नवमीला रविवार २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा येणार असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading