पुढच्या वर्षी गणपती ३१ ऑगस्टला

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेशभक्तांची हाक श्रीगणेशाने ऐकली असून पुढच्या वर्षी गणपती १० दिवस लवकर म्हणजे ३१ ऑगस्टला येणार आहेत. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. सोमण यांनी पुढच्या १० वर्षांच्या गणेश चतुर्थीच्या तारखा सांगितल्या आहेत. २०२२ मध्ये ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी येत असून २०२३ मध्ये १९ सप्टेंबर, २०२४ मध्ये ७ सप्टेंबर, २०२५ मध्ये २७ ऑगस्ट, २०२६ मध्ये १४ सप्टेंबर, २०२७ मध्ये ४ सप्टेंबर, २०२८ मध्ये २३ ऑगस्ट, २०२९ मध्ये ११ सप्टेंबर, २०३० मध्ये १ सप्टेंबर तर २०३१ मध्ये २० सप्टेंबरला गणेश चतुर्थी येणार असल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading