पालघरमध्ये भूकंपाचे पुन्हा सौम्य धक्के

पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तीन दिवसापूर्वीच पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हे धक्के ३.४ रिश्टर स्केलचे होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटरवर होता. गेले काही महिने पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत असून त्यामुळं सध्या भूकंपाचे धक्के जाणवणा-या परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading