पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उद्या सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्या सकाळी 8.35 ते 9.35 या दरम्यान इतर कोणत्याही शासकीय अगर निमशासकीय कार्यालयांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करु नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्या नंतर आयोजित करावा. सर्व सार्वजनिक आणि शासकीय इमातींवर, तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.
स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त प्लास्टिकचे झेंडे न वापरण्याबाबत तसेच कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक अंतर ठेऊन आणि याबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्याबाबत तसेच प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading