पाण्याच्या टाकीत वॉटर प्रूफींगचे काम करताना ४ कर्मचारी आढळले बेशुध्द – २ मृत तर दोघांवर उपचार सुरू

हरिनिवास सर्कल येथील मराठा मंडळ इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत ४ कर्मचारी वॉटर प्रुफींगचे काम करत असताना बेशुध्द अवस्थेत पडल्याचे आढळले. आज संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास मराठा मंडळ येथील अनिवासी इमारतीच्या टेरेसवरील १० बाय १० च्या पाण्याच्या टाकीत स्वराज इंटरप्रायझेसचे चार कर्मचारी वॉटरप्रूफींगचे काम करण्यासाठी आले होते. परंतु साफसफाईनंतर हे कर्मचारी पाण्याच्या टाकीत बेशुध्द अवस्थेत पडले होते. घटनास्थळी नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे प्रमुख, विभागीय अधिकारी-कर्मचारी तसेच प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ४-रुग्णवाहिका, १-फायर इंजिन, १-रेस्क्यु वाहन आणि २-जिप वाहनासह उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांच्या मदतीने चारही व्यक्तींना टाकीमधून बाहेर काढून नौपाडा पोलिस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले. यामधील योगेश नरवणकर आणि विवेककुमार या दोघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गणेश नरवणकर आणि मिथुन ओझा यांच्यावर संपदा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कर्मचारी इंदिरानगर येथील रहिवासी होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading