परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

शुक्रवार पहाटेपासून पासून परिवहन सेवेच्या कंत्राटी वाहकांनी विविध मांगण्यासाठी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, मात्र अद्यापही या संपाकडे प्रशासनाने लक्ष दिल्याचं दिसत नाही. दरवर्षी ठामपा सामान्य करदात्यांच्या पैशातून मदत देऊन टीएमटी च्या तुटीचा अर्थसंकल्प सावरून परिवहन सेवा मार्गक्रमण करीत आहे. परिवहन सेवेच्या कंत्राटी वाहकांनी सात ऑगस्ट रोजी निवेदन पाठवून २१ ऑगस्ट रोजी संप करण्याचे घोषित केले होते पण २९ ऑगस्ट रोजी होऊनही दोन आठवडय़ात तोडगा काढण्याचे अश्वासित करून तोडगा न निघाल्यामुळे वाहकांना गणपती सणाचा वेळीच संपाचा निर्णय घेणे भाग पाडले. यामुळेच प्रवाशांची मोठी कोंडी झाली आहे. विशेषत काही शासकीय कार्यक्रम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीएमटी बसेस पाठविल्याचे माहिती समजले. आधीच दुष्काळ त्यात दुष्काळचा तेरावा महिना करून ठामपानेच प्रवाशांचे हाल केले असून प्रवाशी हक्कावर प्रशासनानेच गदा आणली आहे. टीएमटी आर्थिक नुकसान अप्रत्यक्ष सामान्य ठाणेकर करदात्यावर पडणार असून हाल तर भोगतोच आहोत वर ऑटोचा आर्थिक भुर्दंड ही नागरिकांना सोसावा लागत आहे. विशेषत सणासुदीचे वेळी ठामपाच्या ज्या अधिकार्यांनी वा कंत्राटदारनी ही परिस्थिती ओढवली याची चौकशी करून होणार्या नुकसानी भरपाई जबाबदार धरून आणि तसेच प्रशासकीय कारवाही आणि गुन्हे नोंदवून तत्काळ तोडगा काढावा आणि प्रवाशांना गणपती सणाचा आनंद व्दिगणीत करावा. तसेच सणासुदीचे वेळी प्रवासी सेवेला प्राधान्य देऊन प्रवासी हक्क जपावेत अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading