ठाणे मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाच्या पथनाट्य स्पर्धेत ए. के. जोशी विद्यालय आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेमध्ये २१ विद्यालयं आणि ७ महाविद्यालयांनी भाग घेतला होता. विद्यालय गटातील पहिलं पारितोषिक ए. के. जोशी हायस्कूलला तर द्वितीय क्रमांक स. दा. वर्तक हायस्कूल बोईसरला तर तृतीय क्रमांक झवेरी ठाणावाला हायस्कूलला मिळाला. उत्तेजनार्थ पारितोषिक बाल विद्या मंदिर किसननगर या शाळेला देण्यात आलं. महाविद्यालयीन गटात प्रथम क्रमांक सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाला तर द्वितीय क्रमांक बा. ना. बांदोडकर कनिष्ठ महाविद्यालयाला मिळाला.