पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी कल्याणमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या मंगळवारी ठाणे जिल्ह्यात येत आहेत. येत्या मंगळवारी म्हणजे १८ डिसेंबरला नरेंद्र मोदी राज्याच्या दौ-यावर असून त्या दरम्यान ते कल्याण मेट्रोचं भूमीपूजन करण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, कल्याण, भिवंडी, ठाणे ही मेट्रो उभारत आहे. या २३.६ किलोमीटरच्या मेट्रोमार्गाच्या भूमीपूजनासाठी नरेंद्र मोदी कल्याणमध्ये येत आहेत. दुपारी अडीच ते साडेतीन या दरम्यान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये असणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading