पंचायत समिती विकास आणि जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण

गेल्या काही वर्षांपासून गाव गावाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग घेतला जात आहे.याच पार्श्वभूमीवर आता पंचायत समिती विकास आराखडा आणि जिल्हा परिषद विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.हा आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याने सर्व जिल्हा परिषद सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन सभागृहात संपन्न झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षकांनी आराखडे तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करणे, प्रकल्प विकास, आराखडा निर्मिती आणि पंचायत विकास आराखड्यास मंजुरी, आराखडा अंमलबजावणी, देखरेख प्रणाली, अनुभवाधारित बदल करणे आणि पंचायत समिती विकास आराखड्यामध्ये बदल याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading